भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकीं

pathaval tethen garjen pavade | kahi dehakade navalokin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकीं॥१॥ म्हणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥ कृपेच्या कटाक्षें निभें कळिकाळा । येतां येत बळाशक्तीपुढें ॥२॥ तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । होईल ते सोपें नाम तुझें ॥३॥