भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती

patanasi neti | ticha khota sneh priti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥ विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥ तुका म्हणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥३॥