भजनी मालिका
← भजनांकडे परत

पर्वतु गोफ़णिये सोकरी लेकरु

parvatu goफ़niye sokari lekaru

पर्वतु गोफ़णिये सोकरी लेकरु । ज्याचेनि तृष्णे आटले सप्तहि सागरु । ज्याचेनि स्वेदें बुडाला मेरु । तया माजी ने तया मी काय करुं ॥१॥ कैसे नवल चोज जालेंगे माये । खांदी गंगा चोरु पळतु आहे ॥२॥ जयाचिया अंगावरी वडाचीं झाडें । तो हा मुरुकुटावरि बैसला कोडें । विवळादृष्टी पाहे निवाडें । घ्या घ्या म्हणोनि ठाकितो पुढें ॥३॥ मनगणिचे तंती वोविली धरणी । ते पिसाळ्यानें घेतली खांदा वाहुनि । त्यासी वोवाळिति चौघीजणी । बापरखुमादेविवराचीं करणी ॥४॥