भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिमळाची धांव भ्रमर वोढी

parimalachi dhanv bhramar vodhi

परिमळाची धांव भ्रमर वोढी । तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥ अविट गे माय विटेना । जवळी आहे परि भेटेना ॥२॥ तृषा लागलीया जीवनातें वोढी । तुझी गोडी लागलिया जिवा ॥३॥ बापरखुमादेविवराविठ्ठलीं आवडी । गोडियेसि गोडी मिळोन गेली ॥४॥