भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें धाव घेती

papapunyasukhaduhkhachin mandalen | ek ekabalen dhav gheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें धाव घेती ॥१॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥ स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥ तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥