भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापाचिया मुळें । झालें सत्याचें वाटोळें

papachiya mulen | jhalen satyachen vatolen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पापाचिया मुळें । झालें सत्याचें वाटोळें ॥१॥ दोष झाले बळिवंत । नाहीं ऐसी झाली नीत ॥ध्रु.॥ मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥२॥ तुका म्हणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं ॥३॥