भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं

pap punya donhi vahati marag | svarganarkabhog yanchin penin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥ एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥ राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥२॥ तुका म्हणे आह्मी खेळतोयांमधीं । नाहीं केली बुद्धी स्थिर पाहों ॥३॥