भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगी लागो मन । कोण चिंतन करी ऐसें

pandurangi lago man | kon chintan kari aisen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
पांडुरंगी लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥ देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥ जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥ मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥