भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे

pandurange ye vo pandurange | jivache jivalage ye vo pandurange

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥१॥ कनवाळू कृपाळू भक्तंलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥ध्रु.॥ भक्तंच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माऊली ॥५॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखदेठ घेऊनि ॥६॥ कृपाळू माउली भुक्तीमुक्तीभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥