भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही

pandurange paha khadalise radi | parinam sendi dharili amhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥ आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥ कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्ही पातकी ही ॥२॥ याचें पावनपण सोडवा चि तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ॥३॥ आम्ही तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥ तुका म्हणे आम्ही मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥५॥