भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती

pandurang kanti divya tej jhalakati

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळा फांकती प्रभा । अगणित लावण्य तेजः पुंजाळले । न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥ कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू शब्देंवीण संवादु दुजेविण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे । परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥ पाया पडुं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे । समोर कीं पाठीमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥ क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥ बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥