भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां

pandharisi javen aisen majhen manin | vithai janani bhete kevhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥ तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥