भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे

pandharichen bhut mothe | alya gelya jhadapi vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीचें भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥ भू खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥ध्रु.॥ तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥२॥ तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥३॥