भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो

pandharicha vas dhanya te chi prani | amrutachi vani divya deho

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥ शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥ तुका म्हणे नाहीं वर्णा अभिमान । अवघेचि जीवन्मुक्त लोक ॥३॥