भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें

pandhari nagari daivat shrihari | jati varakari vratanemen

रचनाकार: संत नरहरी · अभंग
पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥ आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥ साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥ आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥