भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांच पाट्या नव खिडकिया पाळणा पहुडया निरंजनीं

panch patya nav khidakiya palana pahudaya niranjanin

पांच पाट्या नव खिडकिया पाळणा पहुडया निरंजनीं ॥१॥ एकवीस सहस्त्र श्वास हुंकार घाली ॥ माया ते मारिली ज्ञानरुपी ॥ध्रु०॥ तेथें निरंजन नाहीं काहींचि नाहीं । तेथें नि:शब्द उठती पाहीं ॥२॥ बापरखुमादेविवरु बाळका घेऊनि मेला । मरोनियां जाला जितपणेंगे माये ॥३॥