भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळितों वचन । परि बहु भीतें मन

paliton vachan | pari bahu bhiten man

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥ करितो पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥ जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥२॥ तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥