भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार

pail disatil bhar | dindi pataka apar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ॥ध्रु.॥ सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥२॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥३॥ तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥४॥