भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल आले हरी । शंख चक्र शोभे करीं

pail ale hari | shankh chakra shobhe karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पैल आले हरी । शंख चक्र शोभे करीं ॥१॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभिस्त ॥२॥ मेघश्यामवर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥३॥ चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥ तुका झालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥