भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां

paikannin panth chalavilya vata | parakhyacha santa modoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाईकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥ पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥ आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥२॥ सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥३॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥४॥