भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें

pahuniyan granth karaven kirtan | tevhan alen jan phal tyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥ नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥ पढोनियां वेद हरीगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥ तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरीच्या नामीं ॥३॥ यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥ तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥