भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहोनिया दिठी नवजाय भूली

pahoniya dithi navajay bhuli

पाहोनिया दिठी नवजाय भूली । मायेची घरकुली खेळतुसे ॥१॥ माया मन पाही मायेसीही पर । परते सत्त्वर निमिष्य नाहीं ॥२॥ खेळतां बाहुली स्वप्नचि वर्तवी । रावोरंक दावी भेदबुध्दी ॥३॥ बापरखुमादेविवर अभेदुनि अभिन्न । हरिरुपीं लीन जिवशिवीं ॥४॥