भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे

pahije te ata praman pratyaksha | aliyane saksha khare khote

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥ काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥ध्रु.॥ ठेवीयली खून करोनी संकेत । तया पाशी चित्त लागलेसे ॥२॥ जाणसी गे मते लेकरांचा लाड । नये पडो आड निष्ठुरता॥३॥ तुका म्हणे आम्हीं करावे वचन । तुम्हांसी जतन करणें तें ॥४॥