भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट

pahen prasadachi vat | dyaven dhovoniyan tat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥ शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥ जालों एकसवा । तुम्हां आडुनियां देवा ॥२॥ तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥३॥