भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते

pahen majakade bharoniyan drushti | bahut himpushti jalon mate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥ सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥ तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥