भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव

pahatan thayathav | jato antaroni dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥ त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥ तुका म्हणे धीरें- । विण कैसें होतें बरें॥३॥