भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी

pahatan rup dolan bharen | antar nure vegalen | ichchhavashen khel mandi | avaghen sandi baheri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥ दिसतो हा नोहे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाठी । होतां भेटी परतेना ॥२॥ म्हणोनि उभी ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका। जो या लोकां दाखवितो ॥३॥