भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहणें जें कांहीं त्यासी मुळी पाहें

pahanen jen kanhin tyasi muli pahen

पाहणें जें कांहीं त्यासी मुळी पाहें । मग सुखी राहें योगीराया ॥१॥ मी तूं द्वैत भ्रांती पहा रे काढुनी । आत्मा तो गिवसुनी राहे सुखें ॥२॥ अविद्या नाथिली रज्जु सर्पापरी । भासली विचारी अनुभवें ॥३॥ तेंव्हा हे उपाधि राहिली सौरस । ज्ञानदेवदास पूर्ण धाला ॥४॥