भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती

paha te pandav akhand vanavasi | pari tya devasi athaviti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥ प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥ सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर झाले तरी ॥३॥