भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथें लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी

paha re tamasa tumacha navhe tethen lag | dein to bhag aliyacha baheri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथें लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥ जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥ न रिघतां ठाव आम्हा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपाल ॥२॥ तुका म्हणे हातां चडे जीवाचिये साठी । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥३॥