भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहा रे हें दैवत कैसें । भक्तीपिसें भाविक

paha re hen daivat kaisen | bhaktipisen bhavik

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहा रे हें दैवत कैसें । भक्तीपिसें भाविक ॥१॥ पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥ शुष्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरी न धरी ॥२॥ तुका म्हणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं हा ॥३॥