भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे

paha kiti ale sharan saman chi kele | nahin vicharile gun dosh konanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥ नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥ तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरी मना । केला तो उगाणा घडल्या महादोषांचा ॥३॥