भजनी मालिका
← भजनांकडे परत

पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा

padhiyanten maga pandurangapashin | maj durbalasi kay pida

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥ या चि साठी दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥ कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥ तुका म्हणे आतां निश्चळि चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥