भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे

pacharitan dhave | aisi thayinchi he save

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥ बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥ जाणे कळवळा । भावसिद्धींचा सोहळा ॥२॥ तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥३॥