भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे

olakhi tayansi hoy eka bhaven | dusariya deven na pavije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥ न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥ वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥ व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥ यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥ होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां ऋण गौळियांचें ॥६॥ गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥