भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ

nitya nem namin te prani durlabh

नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायणहरि नारायणहरि । भक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥ हरिवीण जन्म नरकचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥