भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंतर ध्यातां हरि

nirantar dhyatan hari

निरंतर ध्यातां हरि । सर्व कर्माची बोहरी । दोष जाती दिगंतरीं । रामकृष्णउच्चारणीं ॥१॥ जप तीर्थ हेंचि नाम । जपव्रता हेंचि नेम । ऐसें धरोनियां प्रेम । तोचि भक्त तरेल ॥२॥ जीव शिव एक करी । शांति क्षमा जरी धरी । त्यापाशीं नित्य श्रीहरी । प्रत्यक्ष आपण उभा असे ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नित्य । त्याचें वचन तेंचि सत्य । त्यांचे वचन सर्व कृत्य । सिध्दि पावेल सर्वथा ॥४॥