भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरालंब स्तंब घातला निजयोगु

niralamb stamb ghatala nijayogu

निरालंब स्तंब घातला निजयोगु । साहि वेगळेसि वो माय ॥१॥ आणिकां न कळे तें त्रिगुणां वेगळें । तें मज गोवळें दावियलें वो माय ॥२॥ दुर्घट घडतां न वर्णवे योग्यता । मज पुढारी वो माय ॥३॥ खुणा जरी बोलों तरी मौन्य पडलें । तें परब्रह्मीं उघडलें दिव्यचक्षु वो माय ॥४॥ तो चिदानंदु पुतळा रखुमाई जवळा । सोईरा सकळांसहित वो माय ॥५॥