भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळिये निकरें कामधेनु मोहरे

niliye nikaren kamadhenu mohare

निळिये निकरें कामधेनु मोहरे । निळेंपणेसरे निळे नभीं ॥१॥ घुमत घुमत निळेमाजि मातु । निळेपणीं देतु क्षेम कृष्णीं ॥२॥ निळिये सागरीं निळे निळेपणें सुंदरी । रातलीसे हरि विरहिणी ॥३॥ ज्ञानदेव सांगे निळियेचे बागे । निळसंगे वोळलेगे निळीमाजी ॥४॥