भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे । निळिमा सहजे । आकारली

nilavarna raj | nilavarna bujhe | nilima sahaje | akarali

नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे । निळिमा सहजे । आकारली ॥१॥ नीळ प्रभा दिसे । नीळपणें वसे । निळिये आकाश । हरपलें ॥ध्रु०॥ निळेपण ठेलें । निळिये गोंविलें । निळपण सोंविळें । आम्हां जालें ॥२॥ ज्ञानदेवी निळा । परब्रह्मीं गोविला । कृष्णमूर्तिं सांवळा । ह्रदयीं वसे ॥३॥