भजनी मालिका
← भजनांकडे परत

निजाचें तेज कीं तेजाचें निज

nijachen tej kin tejachen nij

निजाचें तेज कीं तेजाचें निज । तेथील तें गुज सांग मज ॥१॥ ब्रह्म तें कायी ब्रह्म तें कायी । ब्रह्म तें कायी सांगा गोसावी ॥२॥ ब्रह्म सदोदित असे सर्वंभूतीं ॥ म्हणौनि सांगे जनाप्रती ॥३॥ ब्रह्म ऐसें नामयानें जाणितलें । ह्रदयीं धरिलें प्राणलिंग ॥४॥ बापरखुमादेविवरु ह्रदयीं प्रगटला । निवांत राहिला ज्ञानदेवो ॥५॥