भजनी मालिका
← भजनांकडे परत

निज तेज बीज नाठवें हे देहे

nij tej bij nathaven he dehe

निज तेज बीज नाठवें हे देहे । हरपला मोहो संदेसीं ॥१॥ काय करुं सये कोठें गेला हरी । देहीं देह मापारी हरी जाला ॥२॥ विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं । चिद्रुपीं हे वृत्ति बुडीयेले ॥३॥ गुरुलिंगी भेटीं निवृत्ति तटाक । देखिलें सम्यक समरसें ॥४॥ दत्तचित्तवृत्ति ज्ञेयज्ञानकळा । समाधि सोहळा विष्णुरुपीं ॥५॥ ज्ञानदेव गाय हरि नामामृत । निवृत्ति त्त्वरित घरभरी ॥६॥