भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां

netrin ashrudhara ubha bhimatirin | laksha charanavari thevoniyan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥ कां गा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥ नेणें करूं भक्ति नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥ चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा । पुकारितों धावां म्हणोनियां ॥४॥