भजनी मालिका
← भजनांकडे परत

नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश

nayanache anganin turyecha prakash

नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश । उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥ श्वेत शाम कळा प्रकाश आगळा । स्वयंज्योति बाळा लक्ष लांवी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन । चैतन्याची शून्य आन नाहीं ॥३॥