भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल पाहीं नवल पाहीं । पाहों जावें तेणें पाहिलें नाहीं

naval pahin naval pahin | pahon javen tenen pahilen nahin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नवल पाहीं नवल पाहीं । पाहों जावें तेणें पाहिलें नाहीं ॥१॥ निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेंच ठाईं ॥२॥ चोखा म्हणे पाहतां पाहणें लपालें । ह्रुदयीं बिंबलें ह्रुदयची ॥३॥