भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा

namachen samarthya vish ten amrut | aisi he prachit ahe jiva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥ तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥ नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥ चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥