भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम पवित्र आणि परिकरु

nam pavitra ani parikaru

नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरुहुनी उदारु । ते तूं धरी कारे सधरु । तेणें तरसी भव दुस्तरु ॥१॥ नरहरिनाम उच्चारी । तेणें तरसिल भवसागरीं ॥२॥ जपें न लाहसी तपें न लाहसी । क्रिये षटकर्मे न पवसी । नामें ऐकरे पावसी । स्वर्गी अमृतपान ॥३॥ क्षीर गोड ऐसें म्हणसी परि तेथेंही वीट असे । नाम उच्चारितां वाचें कोटि जन्माचें पातक नासे ॥४॥ मन मारुनियां सायासी परि तेथेंही अवगुण असे । नाम उच्चारितां वाचें सकळिक ध्यान डोळा दिसे ॥५॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे विपायें नाम आलें वाचें । जळती डोंगर कल्मषाचें भय नाहीं कळिकाळाचें ॥६॥