भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाद भेद सिध्द अवघेचि विरुध्द

nad bhed sidhda avaghechi virudhda

नाद भेद सिध्द अवघेचि विरुध्द । जेणें तुटे भेद तेंची जपे ॥१॥ सुताचिये गुंजे सुतचि पैं माजे । हरिचरणांबुजें निवडिती ॥२॥ रुक्मिणीचा नाहो हाचि पैं उगवो । प्रपंच ते वावो जावो परतां ॥३॥ ज्ञानदेवा चित्त हरि गोत वित्त । विज्ञान उचित ज्ञानघनें ॥४॥