भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पुसतां गेला बहिणीचीया घरा

na pusatan gela bahinichiya ghara

रचनाकार: संत बंका · अभंग
न पुसतां गेला बहिणीचीया घरा । गांव मेहुणपुरा नांदतसे ॥१॥ नाम तें निर्मळा निर्मळेचे तीरी । वाचे निरंतरी नामघोष ॥२॥ चोखा तैसी बहिण बहिण तैसा चोखा । सदा नाम मुखा विठोबाचें ॥३॥ वंका म्हणे धन्य ज्याचा अमृतजन्म । निघे अस्थी नाम विठोबाचें ॥४॥