भजनी मालिका
← भजनांकडे परत

न गणवे परिमाणें

na ganave parimanen

न गणवे परिमाणें न बोलवे अनुमानें । तो सहज निर्वाणी ज्ञानें फ़ळला वो माय ॥१॥ मुक्ताची साउली मजवरी पडली । ढेसी ढेसी वोल्हावली अमूर्तधारी वो माय ॥२॥ तेथें एक नवल वर्तलें वो साजणी । सांगतां मिठी मौनी पडली वो माय ॥३॥ ऐसा परोपरी फ़ळला दिव्यरुपें फ़ावला । तो रखुमादेविवरु जोडला वो माय ॥४॥